वार्ताहर / कुंभोज
संपूर्ण देशाला कोरोनो पासून वाचवण्यासाठी आरोग्य विभाग, पोलिस यंत्रणा, शिक्षक विभाग ग्रामपंचायत विभाग व प्रशासन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून त्यांनी घेतलेल्या काटेकोर निर्णयामुळेच आज मोठ्या प्रमाणात करोनो पासून नागरिकांचा बचाव होत आहे. परिणामी स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेच्या जीवाचे संरक्षण करणाऱ्या या सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कार्याला सलाम असे गौरवोद्गार कुंभोज जिल्हा परिषद सदस्य व कोल्हापूर जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समितीचे सभापती प्रवीण यादव यांनी काढले.
ते कुंभोज तालुका हातकणंगले येथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुंभोज जिल्हा परिषद मतदार संघातील कुंभोज, नेज, हिंगणगाव, दुर्गेवाडी परिसरातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी मदतनीस ग्रामपंचायत कर्मचारी, रिक्षा वाहतूक करणारे समाजसेवक आदी मान्यवरांचा सत्कार प्रसंगी बोलत होते. परिणामी येणाऱ्या काही दिवसात जनतेने संचार बंदीचे काटेकोरपणे पालन करून कोरोनो हटवण्यासाठी मदत करावी असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रवीण यादव युवाशक्ती तसेच शिवसेनेच्या वतीने आशा स्वयं सेविका आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी यांना कोरोनो कालावधीत चांगले सहकार्य केल्याबद्दल घरगुती साहित्याचे वाटप शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले. यावेळी सभापती प्रवीण यादव यांच्या वाढदिवसा बद्दल हिंगणगाव सरपंच शीला पाटील, कुंभोज सरपंच माधवी माळी, दुर्गेवाडी सरपंच अशोक पाटील ,कुंभोज उपसरपंच सुकुमार पाटील, हिंगणगाव उपसरपंच अभिजीत नळे, दुर्गेवाडी उपसरपंच गुणाबाई पाटील तसेच, आशा स्वयंसेविका रिक्षा युनियन व ग्रामपंचायत कर्मचारी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व ग्रामस्थ यांच्या वतीने सेनी टायझर व मास्क, वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी त्यांनी कुंभोज बुवाचे वठार रस्ता खडीकरण यासाठी नऊ लाख रुपये, कुंभोज प्राथमिक केंद्र शाळा सुधारण्यासाठी आवश्यक निधी तसेच कुंभोज येथे दोन सॅनीटायझर सिस्टीम व मतदारसंघातील प्रत्येक घरांमध्ये सॅनीटायझर वाटप ची घोषणा केली. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, शिवसैनिक, शिक्षक वर्ग उपस्थित होता स्वागत प्रास्ताविक माणिक कागवाडे व आभार कलगोंडा पाटील यांनी केले.








