ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
‘कोरोनिल’ औषधाचा दिशाभूल करणारा प्रचार केल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव यांच्यासह चौघांविरोधात FIR नोंदविण्यात आला आहे.
कोरोनिल औषधाच्या सेवनामुळे 7 दिवसात कोरोना रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असा प्रचार जयपूरमध्ये बाबा रामदेव, पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण आणि अन्य दोघांनी या औषधाच्या लॉन्चिंग वेळी केला होता. त्यानंतर पतंजलीचे हे औषध वादाच्या भोवऱ्यात सापडले. त्यानंतर आयुष मंत्रालयाने या औषधाच्या चाचण्यांचे सर्व रिपोटर्स मागवले आहेत. तसेच कोरोनामधून मुक्ती देणारे औषध, अशी जाहीरात बंद करण्याचेही आदेश दिले.
बाबा रामदेव, पतंजली आयुर्वेदचे एमडी आचार्य बालकृष्ण, शास्त्रज्ञ अनुराग, एनआयएमएसचे चेअरमन बलबीर सिंह तोमर आणि संचालक अनुराग तोमर यांच्याविरोधात कोरोनिल औषधाचा दिशाभूल करणारा प्रचार केल्याबद्दल जयपूरच्या ज्योतिनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.