1162 कोरोनामुक्त : 6397 सक्रिय रुग्ण
प्रतिनिधी / पणजी

कोरोनाचे बळी कमी होत असल्यामुळे राज्यातील जनतेला थोडासा दिलासा मिळाला असून गेल्या 24 तासात म्हणजे सोमवारी 13 जणांचा अंत झाला तर 418 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण बळींची संख्या 2840 झाली असून सक्रिय रुग्ण 6397 पर्यंत खाली आहेत. बळींची संख्या कमी होत असली तरी बाधितांची संख्या आणखी कमी होण्याची गरज असून तीच सध्या चिंतेची बाब आहे.
दिवसभरात 69 जणांना हॉस्पिटलात भरती करण्यात आले असून 349 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले तर 1162 जण कोरोनातून बरे झाले. आतापर्यंत मिळून एकूण 159811 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 150574 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे. हॉस्पिटलातून 74 जणांना घरी पाठवण्यात आले.
विविध आरोग्य केंद्रातील रुग्णसंख्या
डिचोली 99, सांखळी 220, पेडणे 255, वाळपई 169, म्हापसा 175, पणजी 301, हळदोणा 91, बेतकी 165, कांदोळी 204, कासारवर्णे 58, कोलवाळ 170, खोर्ली 153, चिंबल 274, शिवोली 139, पर्वरी 268, मये 77, कुडचडे 203, काणकोण 133, मडगाव 506, वास्को 193, बाळ्ळी 182, कासावली 246, चिंचणी 104, कुठ्ठाळी 232, कुडतरी 151, लोटली 209, मडकई 138, केपे 165, सांगे 185, शिरोडा 144, धारबांदोडा 127, फोंडा 517, नावेली 147.
विविध आरोग्य केंद्रातील रुग्ण संख्या कमी होत असून डिचोली, हळदोणा, कासारवर्णे, मये या आरोग्य केंद्रातील रुग्ण संख्या 100 च्या खाली गेली आहे. मडगाव येथे सध्या 506 रुग्ण असून कासारवर्णे येथे सर्वात कमी म्हणजे 58 रुग्णांची नोंद आहे. फोंडा येथेही 517 रुग्ण असून राजधानी पणजीतही 300 पेक्षा जास्त रुग्ण नोंद झाले आहेत. गोव्यात बाहेरून आलेला एक प्रवासी कोरोनाबाधित सापडला आहे. गेल्या मे महिन्यात सर्वाधिक कोरोना बळी गेले असून 1 जूनपासून संसर्ग कमी होत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
खासगी हॉस्पिटलातही अनेकांचे मृत्यू गेले जवळजवळ सुमारे वर्षभर गोव्यात कोरोना बळींचे सत्र चालू असून सरकारी हॉस्पिटलसह खासगी हॉस्पिटलात देखील कोरोनामुळे अनेकांचे बळी गेले. अनेक खासगी हॉस्पिटलांनी कोरोना बळींची माहिती लपवून ठेवली आणि ती उघड होऊ दिली नाही, परंतु आता खासगी हॉस्पिटलात 67 जणांचे प्राण गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून त्यासाठी 9 महिने जावे लागले. त्याची नोंद आता 9 महिन्यानंतर करण्यात आली असून 5 ऑगस्ट 2020 ते 22 मे 2021 या कालावधीत त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एकूण बळी 2840 झाले असून त्या खासगी हॉस्पिटलांवर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले.









