मेढा येथे सुसज्ज कोविड सेंटरचे उद्घाटन
प्रतिनिधी / मेढा
शासनाचे नियमाचे पालनं केल्यास व योग्य ती खबरदारी घेतल्यास कोरोनापासून आपला नक्कीच बचाव होईल. मेढा ग्रामीण रुग्णालयात सुसज्ज कोविड सेंटर सुरू होत आहे.ही तालुक्याच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. पण नुसते सुसज्ज रुग्णालय व मशनरी असुन उपयोग नाही. तर त्यासाठी डॉक्टर्स , ऑपरेटर , व आरोग्य कर्मचाऱ्यांचीही उपलब्धता ही महत्वाची आहे. असे प्रतिपादन आ. श्री. छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मेढा ग्रामीण रुग्णालयातील ३० बेडच्या कोविड सेंटरचे उद्घाटन आ.श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अध्यक्षतेखाली व शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनिल चव्हाण , प्रांताधिकारी मिनाज मुल्ला ,तहसिलदार शरद पाटील, गरविकास अधिकारी सतिश बुध्दे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवानराव मोहिते, मुख्याधिकारी अमोल पवार , नगराध्यक्ष अनिल शिंदे,उपनगराध्यक्ष दत्ता (आ०णा) पवार, डॉ. धुमाळ, डॉ.पारेकर ,, डॉ. यादव व मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पूढे बोलताना आ. भोसले पूढे म्हणाले , विकास काममध्ये मी सातारा जावली असा कधीच भेदभाव केला नाही. म्हणूनच दोन्ही तालुक्यातील जनतेसाठी कुटुंबियांचे वतीने सातारा येथे ८० बेडचे सेंटर सुरु केले आहे. जावली तालुका दुर्गम असून सुरू करत असलेल्या सेंटर साठी सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करून द्यावीत. येथील जनतेनेही प्रशासनाचे नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य
करावे असे आवाहन आ. भोसले यांनी केले.
याप्रसंगी बोलताना डॉ. सुनिल चव्हाण म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टसिंग व सॅनिटरचा वापर करावा. व त्रास सुरु झाल्यास त्वरीत आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. आज ३० हजारांपैकी ८३०० लोक उपचार घेत आहेत.शंभर पैकी तीन लोक कोरोनाला बळी पडत आहेत.. पाच टक्के लोकांनाच व्हेंटिलेटरची गरज लागते.मुळचा आजार असणाऱ्या लोकांनाच त्रास होतो. त्यामुळे दुर्लक्ष न करता तात्काळ आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे सुचित केले. यावेळी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला जावलीतील प्रशासकिय व आरोग्य टिम एक नंबरची असून सर्वांच काम सुंदर आहे. वलीत ४ एप्रिलला पहिला रुग्ण निझरे गांवात सापडलाआणि आकडा आजपर्यंत वाढतच आहे.
Previous Articleसहानुभूतीने दुसऱयांची अंतःकरणे उघडतात
Next Article दोघा तोतया एसीबी अधिकाऱयांना अटक









