प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात कोरोनाचा वाढत चाललेला प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्याचे चित्र दिसत आहे.शहरात कोरोनाचा कहर सुरू असून रात्रीच्या रिपोर्टमध्ये तामजाईनगर,सदरबाजार, शाहुपुरी, जरंडेश्वर नाका येथे ही रुग्ण आढळून आले आहेत.त्यामध्ये शाहूपुरी येथील गुल मोहर कॉलनीतल्या उधोजकाच्या कुटूंबाला बाधा झाली असून तो भाग कंटेंटमेंट झोन करण्यात आला आहे.प्रतिभा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 29 वर्षीय नर्सला कोरोनाची बाधा झाली आहे.कोरोनाचा विळखा सातारा शहराला अधिक घट होत असून शहराचा फास आवळला जात आहे.
सातारा शहरात मार्च, एप्रिल महिन्याच्या तुलनेत गेल्या आठ दिवसात शहराच्या ठराविक भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.उपनगरात तर कोरोनाचा वाढत चाललेला आकडा मोठा होवु लागला आहे.कोरोना बाधित आढळून येण्यामध्ये शाहूपुरी, सदरबाजार, शाहूनगर, खेड परिसर यांचा समावेश होत आहे.शहरात ही तीच तीच ठिकाणे चर्चेत राहत असून अनेक इमारती सील करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये शाहूपुरी येथील गुलमोहर कॉलनीत राहणारा उधोजकाचे कॉलेज सायगाव येथे असून कामानिमित्त तो उधोजक इकडे तिकडे फिरत असतो.त्याने सायगाव येथे कुटूंबाच्या सदस्यांचे स्वाब दिले होते.स्वाबचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर आज सकाळी शाहूपुरीत ग्रामपंचायतीच्यावतीने पंचायत समिती सदस्य संजय पाटील, सरपंच गणेश आरडे ग्रामसेवक मोहन कोळी, मंदार पुरोहित,आरोग्य कर्मचारी यांनी त्या परिसरात फवारणी करून परिसर सील केला.तसेच प्रतिभा हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या 29 वर्षाच्या नर्सला बाधा झाली आहे.त्याच बरोबर तामजाईनगर, सातारा येथील 66 वर्षाचा पुरुष, 5 वर्षाची बालिका, 1 वर्षाचे बाळ,शिवनगर, एमआयडीसी, सातारा येथील 2 बालिका, 55,25,25 वर्षीय महिला, 30,28, 58 वर्षीय पुरुष, 13 वर्षाचा युवक, सदर बझार, सातारा येथील 30,27, 25, 21 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय महिला, जरंडेश्वर नाका, सातारा येथील 9 वर्षाची बालिका, कोडोली येथील 26 वर्षीय महिला, अमरलक्ष्मी देगाव येथील 35 वर्षीय महिला, सातारा येथील 62, 76 वर्षीय महिला, रामकृष्णनगर, सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, करंजे येथील 34 वर्षीय पुरुष, प्रतिभा हॉस्पिटल येथील 29 वर्षीय महिला, सातारा येथील 31 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.तसेच ग्रामीण भागात जिहे येथील 34 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 82 वर्षीय पुरुष, गोजेगाव येथील 45 वर्षीय महिला.








