कुरुंदवाड / प्रतिनिधी
नृसिहवाडी येथील कोरोना समिती आणि आरोग्य विभागाचा अनागोंदी कारभार समोर आला आहे. मुंबईहून आलेल्या कुटुंबाला संस्थात्मक अलगीकरण कक्षात न ठेवता घरात होम क्वारंटाइन ठेवले आहे. एकाला एक आणि एकाला वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित आहे. आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य विभागांच्या गलथान कारभारामुळे कोरोना मुक्त नृसिंहवाडीत धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
देशात कोरोना व्हायरस ने हैराण करून सोडले. कोल्हापूर जिल्ह्य़ातील कोरोना रूग्णांची संख्या 725 च्या पुढे गेली आहे. जिल्ह्यात मुंबई, पुणे येथून आलेल्या लोकांमुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. प्रशासनाने स्थनिक कोरोना समिती आणि आरोग्य विभागाला याबाबत बाहेरील लोकांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र नृसिंहवाडी मध्ये याबाबत अनागोंदी कारभार समोर आला आहे. मुंबई, पुणे येथून आलेल्या लोकांना विलगीकरण कक्षात न ठेवता घरात होम क्वारंटाइन करण्याचा प्रकार समोर आला आहे. घरात होम क्वारंटाइन असताना लोक बाहेर फिरत आहेत. क्वारंटाइन कालावधी संपण्याच्या आधी ते लोकांच्या संपर्कात आल्या मुळे धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या आधी आलेल्या लोकांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. मग आता का नाही. विलगीकरण कक्ष रिकामा असताना एकाला एक आणि एक न्याय वेगळा का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत नृसिंहवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे डॉ. पी. एस. पाखरे यांना विचारले असता नियमानुसार त्यांना होम कोरनटाईन करण्यात आले आहे. त्याना घरातून बाहेर पडू नये अशी सूचना दिली असल्याचे सांगितले.