ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा संसर्ग एप्रिलच्या मध्यावधीत शिखरस्थानी पोहचेल. तर मे च्या अखेरीपासून संसर्गाचे प्रमाण कमी होईल, असा अंदाज आयआयटी कानपूरमधील संशोधक मनिंद्र अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाच्या सद्यस्थितीला गणितीय फूटपट्टी लावून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
भारतात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर ‘सूत्र’ या गणिती प्रारुपाचा वापर करुन शास्त्रज्ञांनी काही अंदाज बांधले होते. त्यानुसार, सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या अधिक असेल आणि फेबुवारी 2021 मध्ये रुग्णसंख्या कमी होईल, हा शास्त्रज्ञांचा अंदाज खरा ठरला. त्यानंतर आता मनिंद्र अग्रवाल यांनी याच गणिती प्रारुपाचा वापर करुन नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वप्रथम पंजाबमध्ये संसर्ग वाढेल, त्यापाठोपाठ महाराष्ट्रात त्याचा उद्रेक पहायला मिळेल. एप्रिलच्या मध्यावधीत कोरोनाचा संसर्ग शिखरस्थानी पोहचेल. तर मे च्या अखेरीपासून संसर्गाचे प्रमाण कमी होईल.









