ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग असो किंवा सीमेवरील आव्हान भारत देश सर्वांशी लढा देण्यास कायमच तयार असतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोरच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ चे बिपिन रावत आदी उपस्थित होते. मोदी म्हणाले, भारतीय संविधानात नागरिकांची कर्तव्ये सांगितलेली आहेत. आणि ती सर्व कर्तव्ये पार पाडणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
पुढे ते म्हणाले, भारताने कोरोना लस तयार केली. यासोबतच भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण केले आहे. भारतीय सैन्याच्या सर्व गरजा आता पूर्ण केल्या जात आहेत. तसेच कोणतेही संकट असो एन सी सी चे कॅडर कायम मदतीसाठी तत्पर असतात.
दरम्यान, कॅडरमध्ये महिलांचे प्रमाण 35 टक्क्यांनी वाढले आहे. संरक्षण दलात अनेकांना संधी मिळाली आहे. शत्रूशी दोन हात करण्यासाठी विरांगणा देखील तयार आहेत. आपल्या शौर्याची देशाला गरज आहे आणि यासोबतच नवनवीन शिखरे आपली वाट पाहत आहेत असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.









