चोवीस तासात 9,419 नवे रुग्ण : 159 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 9,419 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर 159 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचदरम्यान 24 तासांत 8,251 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. टक्केवारीचा विचार करता देशाचा रिकव्हरी रेट 98.36 टक्के आहे. देशाचा दैनंदिन पॉझिटिव्ह रेट 0.73 टक्के आहे. दरम्यान, पॉझिटिव्हिटी रेट सलग 66 दिवसांपासून 2 टक्क्मयांनी खाली आला आहे. नव्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत एकूण 3 कोटी 40 लाख 97 हजार 388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आतापर्यंत 3 कोटी 46 लाख 66 हजार 241 जणांना कोरोनाची बाधा झाली असून 4 लाख 74 हजार 111 जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बुधवारच्या चोवीस तासात देशात लसीचे 80 लाख 86 हजार 910 डोस देण्यात आले आहेत.









