जिल्हा केमिस्ट ऍण्ड ड्रग्जिस्ट असोसिएशन अध्यक्ष उन्मेश शिंदे
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या सुरूवातीला सॅनिटायझर, मास्क, ऑक्सीमीटर यांच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या मात्र गेल्या महिनाभरापासून हे दर 35 ते 40 टक्क्यांनी घसरल्या आहेत. मुळात विविध कंपन्या या उत्पादनात मोठय़ा प्रमाणावर उतरल्या आणि मोठी स्पर्धा आणि चढाओढ सुरू झाली. सध्या हे संरक्षक साहित्याचे उत्पादन अगदी मोठय़ा प्रमाणावर होत आहे परिणामी आपोआप दर कमी झाल्याची माहिती केमिस्ट आणि ड्रग्जिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष उन्मेश शिंदे यांनी दिली.
मार्च, एप्रिलमध्ये संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार केला होता, यापासून खबरदारी घेण्यासाठी सॅनिटायझरचा वापर करून वारंवार हात स्वच्छ करा असे आवाहन जागतिक आरोग्य संस्थेकडून करण्यात आले होते परिणामी कामाच्या ठिकाणी वगैरे जाताना तसेच इतर कामानिमित्त बाहेर पडताना सॅनिटायजर ची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली मात्र सुरूवातीच्या तीन महिन्याच्या कालावधीत सॅनिटायझर, मास्क यांचा मार्केटमध्ये मोठा तुटवडा होता कारण कोरोनाची व्याप्ती जगात इतक्या मोठय़ा प्रमाणावर वाढेल याची कल्पना कोणालाच नव्हती त्यामुळे ही उत्पादने निर्माण करताना कंपन्यांनाही अंदाज आलेला नाही आणि मेडिकल मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणावर या साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला त्यानंतर मात्र हळूहळू उत्पादन करणाऱया नवनवीन कंपन्या यात उतरल्या त्यामुळे उत्पादन क्षमता 100 पटीने वाढली आज हजारों कंपन्यांचे सॅनिटायझर, मास्क, ऑक्सीमीटर, वेफोरायझर बाजारपेठेत, मेडिकलमध्ये उपलब्ध झालेले आहे उत्पादनाची आवकता वाढल्याने गेल्या महिन्यापासून आपोआपच या उत्पादनांचे दर कमी झाल्याचे उन्मेष शिंदे यांनी सांगितले.
आज घराबाहेर पडताना प्रत्येक व्यक्ती स्वत:जवळ सॅनिटायझरची बॉटल बाळगते इतकेच नव्हे तर प्रत्येक शासकीय आणि अशासकीय कार्यालयात सॅनिटायझर केल्याशिवाय प्रवेश दिला जात नाही. मास्क तर सक्तीचे आहे, मास्क नसेल तर 500 रूपये दंड वसूल केला जातो त्यामुळे मास्कचे विविध ब्रॅन्डस बाजारात पहावयास मिळतात. कापडी मास्क शिवण्यासाठी आता बचतगटांना ऑर्डस् दिल्या जात असल्याने बचतगटांना आर्थिक लाभ होत आहे विविध टेलर दुकानांमध्येही मोठय़ा प्रमाणावर ऑर्डस घेतल्या जातात सध्या यूज ऍण्ड थ्रो मास्क पेक्षा कापडी व इतर कंपन्यांच्या मास्क अधिक मागणी बाजारपेठेत दिसून येत आहे. ज्या अर्थी उत्पादनांना मागणी वाढली त्याअर्थी लोकांमध्ये जागरूकता चांगल्या प्रमाणात निर्माण झाली ही बाब लक्षात येते. सुरूवातीला सॅनिटायझरचा 5 लिटरचा कॅन 2 ते 2500 हजाराला उपलब्ध होत होता आता 700 पर्यंतही बाजारात उपलब्ध आहेत. मास्क अगदी 30 रूपयांपासून 200 पर्यंत आहेत तर वेफोरायजरच्या किंमती या बॅन्ड कंपन्यांप्रमाणे म्हणजेच अगदी 150 पासून 350 पर्यंत उपब्लध झाल्या आहेत.









