सध्या भारतात काही राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. सध्या बऱयाच नागरिकांचे लसीचे 2 डोस होऊनसुद्धा त्यांना कोरोना संक्रमण होत आहे, त्यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम म्हणून लसीकरणावरही याचा काही अंशी परिणाम होईल असे जाणकाराना वाटत आहे. दोन डोस घेऊनसुद्धा कोरोना झाला, अशा बातम्या प्रसार माध्यमातून ऐकण्यास येऊ लागल्या आहेत. लोकांच्या मनात आहे की दोन डोस घेतल्यास कोरोना संपला. परंतु असे न दिसता परत काही मोजक्मया लोकांना याचा सौम्य संसर्ग होताना आढळतो. एखादे कोरोना व्हॅक्सिन शरीरात टोचल्यानंतर आपल्या शरीरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाविरुद्ध लढण्याचे कार्य करते, लस बनवताना या विषाणूंचे निष्क्रिय अंग किंवा काही प्रोटिन्स (अँटीजेन्स) असतात, त्याना शरीरात सोडल्याने आपली इम्यून सिस्टीम व मेमरी टी सेल, कार्यरत होऊन या व्हायरसला ओळखून त्याच्या विरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती (अँटीबॉडीज) तयार करते व त्यामुळे कोरोनापासून शरीराचे संरक्षण होते.
सध्या सर्वत्र वापरल्या जाणाऱया कोव्हीशिल्ड लसींचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने दिले जात आहेत. यामुळे 4 आठवडय़ांच्या फरकाने डोस दिले तर शरीरात कोरोना प्रतिकारक शक्ती (अँटीबॉडीज) तयार होण्याचे प्रमाण 55% पासून 70% टक्क्मयांपर्यंत इतके आहे. ही रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी लसीकरणानंतर पुढील 2 ते 3 आठवडय़ांचा कालावधी लागतो. लसीकरणाचा फायदा हाच आहे की, लस घेणाऱयाला सिरीयस कोविड होण्याचे प्रमाण जवळपास नाही व आपल्यामुळे दुसऱयांना संक्रमण होण्याचे वाचते. लसीकरणानंतर जरी कोरोना संसर्ग झालाच तर तो खूप सौम्य प्रकारचा असतो, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण नगण्य असते. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होण्याची आवश्यकता भासत नाही, श्वसनाचा त्रास अथवा न्यूमोनिया होत नाही. त्यामुळे आपण शंभर टक्के रोगास थोपवू शकत नसलो तरी त्यामुळे होणाऱया मृत्यूपासून बचाव होऊ शकतो. दोन्ही डोस घेऊन सुद्धा कोरोना झालाच तर तो सौम्य प्रकारचा असतो. कोरोना विरुद्धचे एकमेव शस्त्र म्हणजे त्यावरील लस हेच आहे.
-Rt-pcr टेस्टमध्ये आजाराची तीव्रता (व्हायरल लोड) किती आहे हे सिटी व्हॅल्यू वरून समजते, जेवढी सी टी व्हॅल्यू जास्त तेवढा व्हायरल लोड कमी आहे असे समजावे. लसी घेऊनसुद्धा होणाऱया या कोविडमध्ये सी टी व्हॅल्यू -24 च्या जवळपास पहावयास मिळते. लसीकरणानंतर होणाऱया कोरोना संक्रमणास ‘ब्रेक थ्रू कोरोना केसेस’ असे म्हटले जाते. अशा केसेस यापुढे येणार व वाढतील सुद्धा. तेव्हा घाबरू नका. अशा येणाऱया रिइन्फेक्शनच्या केसेस सौम्य प्रकारच्या असतात. समजा कोव्हीशिल्डच्या दोन लसीमुळे 70% इतक्मया प्रमाणात कोरोना संरक्षण मिळते, उर्वरित 30% संरक्षण न मिळाल्यामुळे आपणास सौम्य कोरोना होऊ शकतो. त्यामुळे व्हॅक्सिन घेतल्यानंतरही प्रतिबंधक त्रिसूत्री उपायोजना (मास्क, हॅण्ड सॅनिटेशन, सोशल डिस्टन्सिंग) याचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे ठरते. लस घेऊनही पुन्हा होणाऱया कोरोनाचा उपाय पुढीलप्रमाणे अनेक अभ्यासक सुचवीत आहेत. लसीकरणाची संख्या वाढवून संक्रमण होण्याचे प्रमाण कमी करायचे, जितके जास्त लोक लस घेतील ते सर्व सुरक्षित राहतील व इतरांनाही ते संक्रमण करणार नाहीत.
सध्या भारतात कोव्हीशिल्डचा डोस चार आठवडय़ाच्या अंतराने दिला जातो, त्यामुळे शरीरात काही आठवडय़ानंतर 50 ते 63% इतक्मया अँटीबॉडीज तयार होतात. नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की हेच डोस बदल करून 8 ते 12 आठवडय़ाच्या अंतराने दिले तर याची अँटीबॉडीज वाढवण्याची क्रिया (एफिकेसी) जास्त होते व त्यामुळे शरीरात 65% वरून 81.3% पर्यंत रोग प्रतिकारक शक्ती वाढेल असे जगभरातील अनेक संशोधक, डब्ल्यूएचओ, ऑक्सफर्ड संशोधन केंद्र, लॅन्सेट वैद्यकीय मासिक सांगत आहेत. दोन लसीमधील अंतर वाढविल्याने आपली कोरोना प्रतिकारशक्ती वाढते असे जर संशोधक सांगत असतील तर भारत सरकारने याचा विचार करून हे तंत्र अवलंबायला हवे. दुसरा डोस पुढे टाकल्याने ‘ब्रेक थ्रू कोरोना’ च्या बातम्या येणे कमी होईल. कोरोना लसीकरणाच्या धोरणात अजूनही काही नवीन योजना राबवल्यातर ही महामारी लवकर आटोक्मयात आणणे सहज साध्य होईल.
1. प्रथमता मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून सर्व नागरिकांना लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे.
2. प्रगत देशात उपलब्ध असणाऱया व 95% प्रभावी ठरलेल्या फायझर, मॉडरना, जॉन्सन अँड जॉन्सन कंपन्यानी बनवलेल्या लशी भारतात उपलब्ध करून ऐच्छिक नागरिकांना स्वखर्चाने घेण्यास परवानगी द्यावी. त्यामुळे सिरीयस कोविड होण्याचे प्रमाण कमी होईल व कोरोना लवकर नियंत्रित होईल.
3. महामारी रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय अन्य पर्याय नाही, म्हणून भारतामध्ये मोजक्मया राज्यांमध्येच दुसरी लाट मोठय़ा प्रमाणात पसरली आहे. ज्या भागात मोठय़ा संख्येने कोरोनाची बाधा झाली आहे अशा हॉटस्पॉटना निवडून तेथील सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण केले तर तेथेच कोरोनाला थोपवता येईल व तो इतर भागात पसरणार नाही. जिथे साथ नाही तिकडे लसीकरण थोडे उशिरा द्यावे.
4. भारताची लोकसंख्या जास्त असल्याने सर्वांना लसीकरण होण्यास वेळ लागेल. त्यामुळे हॉट स्पॉट व मोठी शहरांची निवड करून सर्वांना जलद लस दिली पाहिजे. सध्याच्या दुसऱया लाटेत देशातील एकूण कोरोना बाधितापैकी 47% रुग्ण एकटय़ा महाराष्ट्रात आहेत अशा ठिकाणी केंद्र शासनाने लसीचा जादा पुरवठा करून हॉटस्पॉट संपवावा.
5. सध्या खाजगी रुग्णालयात 250 ा घेऊन लस दिली जात आहे, अशी केंदे जास्त संख्येने वाढवावीत जेणेकरून लसीकरण जास्त होईल.
6. दुसऱया टप्प्यातील 60 वर्षावरील ज्ये÷ नागरिकांना व 45 ते 59 वयातील ज्यांना इतर आजार (कोमॉर्बिड) आहेत त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका अधिक आहे म्हणून त्यांना मोफत लस देणे सुरू आहे. परंतु यापेक्षाही वयाने लहान असणारेसुद्धा कोमॉर्बिड असू शकतात त्यामुळे वयाचे बंधन काढून टाकावे व जे 18 वर्षावरील इतर आजाराने त्रस्त (कोमॉर्बिड) आहेत अशानाही सरकारने नियम बदलून लसीकरण घेण्याची परवानगी द्यावी.
7. सरकारने भारतातील सुमारे 20 लाख खाजगी डॉक्टर्सना व समाजसेवी संस्थाना आवाहन करून देशसेवा म्हणून काही दिवस लस देण्याच्या आपत्कालीन कार्यात मदत घेतली तर काहीच महिन्यात संपूर्ण देशाचे लसीकरण पूर्ण होईल.
8. ज्या नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे त्यांना निसर्गतः पहिला डोस घेतल्याप्रमाणेच कोरोना विरुद्ध रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली असते, काही महिन्यापर्यंत ही राहते असे संशोधक सांगतात. त्यामुळे अशा नागरिकांना बूस्टर म्हणून दुसरा एकच डोस द्यावा असे काही संशोधक सांगतात. 9. कोरोना संरक्षणार्थ घेतल्या जाणाऱया लसी या वेगवेगळय़ा कंपनीमार्फत वेगवेगळय़ा प्रकारे बनवलेल्या असतात. प्रत्येकाची शरीरात अँटीबॉडी निर्माण करण्याची ताकतसुद्धा कमी जास्त असते, म्हणून पहिला डोस ज्या कंपनीचा घेतला आहे त्याच कंपनीचा दुसराही डोस घेणे गरजेचे आहे.
भारताची कोरोना महामारीमध्ये जगातील इतर देशांच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी आहे. आपल्या देशाचा मृत्यूदरही अत्यल्प आहे. आपणाकडे लसी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. आजवर सुमारे दीड कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे, यासोबतच भारतीयांची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा चांगली आहे. काही भागात हर्ड इम्युनिटीसुद्धा तयार झाली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून कोरोनाविरुद्धची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे अशी स्थिती आहे. गेल्या महिन्यापासून काही भागात दुसऱयांदा कोरोना संक्रमण झपाटय़ाने वाढले असले तरी, मृत्युदर अत्यल्पच आहे. सौम्य प्रकारचे रुग्ण सध्या जास्त आहेत. व्हायरसने आपल्या रचनेतील (म्युटेशन) आंतरिक बदलामुळे त्याचे संक्रमण तीव्र झाले आहे. परंतु नशिबाने बदल झालेल्या कोरोना व्हायरसवर सध्याची लस प्रभावी ठरलेली आहे. त्यामुळे काळजीचे कारण नाही. आता लसीकरणाचा वेग वाढवून जास्तीत जास्त नागरिकांना लस देऊन संरक्षित करणे, लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवणे, हॉटस्पॉट निवडून तेथील सर्व नागरिकांना तात्काळ लसीकरण करणे, खाजगी डॉक्टरांना व सामाजिक संस्थांना लसीकरण कार्यात सहभागी करून घेणे, समाजात लसीविषयी जागृती निर्माण करून त्यासंबंधी असलेले गैरसमज माध्यमांच्याद्वारे दूर करून लस घेण्यास प्रवृत्त करावे. प्रगत देशातील इतर कंपन्यांनी बनवलेल्या प्रभावी लसीना भारतात परवाना देऊन स्वखर्चाने घेण्यास नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. अशा विविध उपायोजना सरकारने विचारात घेऊन त्या राबवाव्यात, जेणेकरून कोरोनाचा संपूर्ण नायनाट होण्यास मदत होईल व महामारी रोखणे साध्य होईल.
डॉ. संजय पंतबाळेकुंद्री








