साटेली-भेडशी / प्रतिनिधी –
प्राणजीवन सहयोग संस्था कणकवली अध्यक्ष संदीप चौकेकर यांच्या पुढाकाराने दोडामार्ग शहर, साटेली भेडशी आणि परिसरातील गावामध्ये सॅनिटायझर फवारणी कार्यक्रम करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्र, रेशन दुकान, बाजारपेठ, ग्रामपंचायत कार्यालये, तलाठी कार्यालये आदी गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात आली. या उपक्रमासाठी या संस्थेचे कार्यक्रम प्रमुख प्रसाद मेहता ,सह कार्यक्रम प्रमुख प्रशांत गावडे ,दोडामार्ग तालुका प्रतिनिधी समिर घाडी ,स्वयंसेवक विवेक दळवी, राहुल गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर , साटेली भेडशी सरपंच लखू खरवत आदींनी मेहनत घेतली.









