ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना संकटात 80 लाख भारतीयांनी एप्रिल ते जुलै या कालावधीत भविष्य निर्वाह निधीतून तब्बल 30 हजार कोटी रुपये काढले आहेत. एका इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कामगार वर्गाला मोठा फटका बसला. त्यामुळे कामगार वर्गाने 8 हजार कोटी कोविड -19 च्या ऑप्शनखाली तर 22 हजार कोटी जनरल ऑप्शनखाली काढले आहेत. 9 जून ते 29 जून या वीस दिवसांच्या कालावधीत 20 लाख कामगारांनी पीएफ खात्यावरुन पैसे काढले आहेत.
भारतातील अंदाजे 6 कोटी पगारदार कामगारांच्या रिटायरमेंट कॉर्पर्सचे व्यवस्थापन करणाऱ्या ईपीएफओमधून मोठ्या प्रमाणावर पैसे काढल्यास आर्थिक वर्ष 2021 मध्ये डब्ल्यू.आर.टी. उत्पन्नावर दबाव येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.