वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या आठ महिन्यापासून कोरोना संकटाने मोठय़ा प्रमाणात जगासह देशभरात थैमान घातलेले आहे. यामुळे उद्योग क्षेत्र सर्वाधिकपणे प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. या कठीण प्रसंगातही काही निवडक कंपन्यांनी उठावदार कामगिरी केल्याचे दिसून येते. या कंपन्यांमुळे घसरत्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागल्याचेही दिर्सफ आले आहे. या कंपन्या पुढील प्रमाणे आहेत.
1. रिलायन्स समूह : चालू वर्षात मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्सने एकूण संपत्तीमध्ये वर्षाच्या आधारे जवळपास 32 टक्क्यांची उसळी घेतली आहे. संपत्ती 10.25 लाख कोटी रूपयांवरून 13.5 लाख कोटी झाली. रुपयाच्या घरात पोहोचले आहे.
2. टाटा समूह : या समूहाची 2020 मधील वेल्थ 30 टक्क्यांनी वाढली आहे. यामुळे चालू वर्षात टाट समूहाची वेल्थ 15.3 लाख कोटीवर गेली आहे.

3.अदानी समूह : अदानी समूहाच्या वेल्थमध्ये 30 टक्क्यांची वाढ. 2020 मध्ये अदानी समूहाची संपत्ती 2 लाख कोटी रुपयांवरून 2.6 लाख कोटी रुपये झालीं.

4.बजाज समूह : बजाज समूहाच्या वेल्थमध्ये वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. यामुळे चालू वर्षात कंपनीची संपत्ती ही जवळपास 6 लाख कोटी रुपये राहिली आहे. या अगोदर ही 5.3 लाख कोटीवर स्थिरावली होती.
5.एचडीएफसी समूह : एचडीएफसीची संपत्ती 2020 मध्ये वर्षाच्या तुलनेत 8 टक्क्यांनी वाढली आहे. एचडीएफसीची संपत्ती ही 1.3 लाख कोटीवरून 1.44 लाख कोटी रुपयावर स्थिरावली आहे.

6.महिंद्रा समूह : महिंद्रा समूहाच्या संपत्तीत 2020 मध्ये वर्षाच्या पातळीवर 33 टक्क्यांची वाढ. संपत्ती 1.7 लाख कोटी रूपयांवरून 2.1 लाख कोटी झाली.
7.कल्याणी समूह : कल्याणी समूहाची संपत्ती 10 टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात 29510 कोटी रुपयांवरून 32362 कोटीवर स्थिरावली आहे.









