ऑनलाईन टीम / मुंबई :
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला लढायला शिकवले. बाबासाहेबांनी विषमतेविरोधात लढा दिला. आता देशवासीय कोरोना विषाणूविरोधात लढा देत आहेत. देेशवासीयांंचा हा लढा अभूूूतपूर्व असून, आपण हा लढा नक्की जिंकू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी सवांद साधला. ते म्हणाले, राज्यात आतापर्यंत 2334 कोरोनारुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 230 जण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 32 जणांची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे. मात्र, कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी राज्य सरकार खंबीर आहे.
राज्यात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच प्लाझ्मा थेरपीची चाचपणी सुरू आहे.कोरोनामुळे भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी 2 समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत.
तसेेेच परराज्यातील हजारो मजूर राज्यात आहेत. त्यांनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांना अन्न आणि निवारा देण्याची सोय सरकारकडून करण्यात येईल. गरज वाटल्यास शिवभोजन थाळींची संख्या वाढविण्यात येईल, असेेेही ते म्हणाले.