प्रतिनिधी / सातारा
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हास्तरावर ग्रामस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. गाव पातळीवरील यंत्रणेतून समिती गठीत करुन कामकाज पार पाडण्यसाठी जबाबदारी निश्चत करुन देण्यात आली आहे.
गाव पातळीवरील गठीत कृती समितीमध्ये नियुक्त केलेले पदाधिकारी शासकीय कर्मचारी व त्यांचे समितीतील पद पुढील प्रमाणे.
संबंधित गावचे सरपंच – पदसिध्द अध्यक्ष, संबंधित गावचे तलाठी- सहअध्यक्ष तर समितीचे सदस्य पदी पुढीलप्रमाणे राहील -सचिव, विविध कार्यकारी सोसायटी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक, महिला बचत गट ग्राम संघ अध्यक्ष, सचिव, महिला बचत गट, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामसेवक या समितीत राहतील.
या समितीची जबाबदारी खालीलप्रमाणे.
अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी, सातारा यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये गठीत केलेल्या समितीने खालीलप्रमाणे जबाबदारी पार पाडण्याचे आदेश देत आहे.
कोविड संक्रमित झालेला रुग्णास सक्तीने घरगुती अलगीकरण करावे. घरातील इतर सदस्य हे कोविड रुग्णांचे संपर्कात येणार नाही याबाबत वेळोवेळी खातरजमा करावी व कोविड संक्रमित रुग्ण व घरातील इतरर सदस्य वेगवेगळ्या खेल्यांमध्ये राहतील अशा प्रकारे संबंधितांना सक्त सूचना द्याव्यात. कोविड संक्रमित रुग्ण व त्या कुटुंबास दैनंदिन अत्यावश्यक सेवेतील वस्तुंचा पुरवठा सुरळीत व वेळेत होईल् याबाबत नियोजन करावे.
कोविड संक्रमित झालेल्या रुग्णांचे कुटुंबातील इतर सदस्यांना व संपर्कातील इतर नागरिकांना तपासणी करुन घेणेबाबत सूचित करावे. कोविड संक्रमित रुग्णाचे हातावर होम आयसोलेशन बाबत शिक्का सक्तीने उमटविणेत यावा. कोविड संक्रमित रुग्णांचे संपर्कात आलेल्या इतर नागरिकांची संबंधित गावातील आशासेविका, आरोग्य सेवक, स्वयंसेवक यांचया मदतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणेत यावी. गावामधील लग्न समारंभ, किंवा इतर अनुषंगिक गर्दी होणारे कार्यक्रम हे शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेतच पार पाडतील याची दक्षता घ्यावी.
गावामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व सॅनिटायझेशन करणेबाबत कार्यवाही करावी. गावामध्ये बाहेरुन येणारे नागरिकांना कोविड सदृश्य अक्षणे आढळल्यास त्यांची तात्काळ तपासणी करणेबाबत पुढील नियोजन करावे. गावामध्ये ज्या ठिकाणी कंटेंन्मेंट झोन घोषित झाला असेल त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळून इतर नागरिकांना बाहेर जाणे अथवा येणे यास प्रतिबंध करण्याची जबाबदारी ग्राम समितीची राहील. गावातील 60 वय वर्ष पेक्षा जास्त जेष्ठ नागरिकांना व 45 पेक्षा जास्त वय वर्ष आणि व्याधी असलेल्या नागरिकांना कोविड लसिकरण करणेबाबत प्रवृत्त करुन त्यांचे जास्तीत जास्त प्रमाणात रजिस्ट्रेशन करुन लसिकरण करणेबाबत नियोजन करणे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









