प्रतिनिधी / सांगली
सांगली, दि. 27 कोरोना विरूध्दच्या लढ्यासाठी सर्वात मोठी गरज स्वयंसेवकांची भासत आहे. कोरोना कमांडो प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षीत स्वयंसेवकाची गरज पूर्ण करण्याचे काम भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त प्रयत्नातून होत आहे. त्यांचा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचे प्रतिपादन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
राजमती भवन नेमिनाथनगर येथे भारतीय जैन संघटना सांगली व वानलेस हॉस्पिटल मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोरोना कमांडो प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, वानलेस हॉस्पिटलचे संचालक डॉ. नथानियल ससे, एनसीसी बटालियनचे कर्नल एस. के. बालू, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्र्रीय कार्यकारणी सदस्य तथा माजी महापौर सुरेश पाटील आदि उपस्थित होते. भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथ्था यांनी ऑनलाईन व्हिडीओव्दारे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन धन्यकुमार शेट्टी व आभार लेफ्टनंट सुभाष पाटील यांनी मानले.कार्यक्रमास कोरोना कमांडो प्रशिक्षणासाठी एनसीसी चे विद्यार्थी व युवक उपस्थित होते.
Previous Articleस्काऊट गाईडचे जिल्हा मुख्यालय आयुक्त अरविंद जावळे कालवश
Next Article सांगली जिल्ह्यात 855 कोरोनामुक्त, नवे 430 रूग्ण








