प्रतिनिधी / इस्लामपूर
कोरोना रुग्ण संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा तथा जयंत पाटील यांनी कोरोनाची दुसरी लाट आल्यासारखे वातावरण आहे. गेल्या वर्ष-सव्वा वर्षात कोरोनाचा हाहाकार पाहिला. सांगली जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सांगलीकरांनो काळजी घ्या, असे आवाहन केले आहे.
गेले वर्षभर रुग्ण वाढल्याने हॉस्पिल कमी पडले.खाटांची संख्या अपुरी पडली. संपूर्ण हॉस्पिटल भरलेली होती. आज त्याच पध्दतीने जिल्हा व महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या वाढत आहे. याबाबत तात्काळ काळजी घेणे आवश्यक आहे. मागील चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांना सूचना देवून गर्दीची विशेषतः बाजारच्या ठिकाणची गर्दी टाळावी, अशी उपाययोजना करण्यास सांगितले.
लॉकडाऊन हा पर्याय नाही.लॉकडाऊनमुळे गोरगरीबांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. अर्थव्यवस्था संकटात येते. गात्र गर्दी थांबवली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होवू शकतो. त्यामुळे कोरोना संबधीत नियमांचे पालन करावे. मास्क वापरणे, स्वच्छ हात धुणे, गरज असेल तरच घराबाहेर पडणे, सरक्षित अंतर ठेवणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी मर्यादा सांभाळल्या तर महिन्याभरात ही लाट खाली नेण्याचे काम करू शकू, याबाबत खात्री आहे. त्यासाठी सर्वांचे सहकार्य महत्वाचे आहे.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








