प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटक राज्यात कोरोना प्रतिबंधात्मक लस, ब्लॅक फंगसच्या औषधांचा तुटवडा आहे हे सत्य आहे. ही समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री सदानंदगौडा यांच्या संपर्कात आहोत. केंद्राकडे वीस हजार इंजेक्शन व्हायल्सची मागणी केली असून केंद्राने 1150 व्हायल्सचा पुरवठा केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलताना दिली. प्राथमिक अहवालानुसार राज्यात 300 हून अधिक ब्लॅक फंगसचे रूग्ण आहेत. या रोगांवर सर्व उपचारांची सोय व संबंधित तज्ञ सर्व जिल्हा इस्तितळात उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आयसीयूत एका रूग्णाला वापरलेली उपकरणे दुसऱया रूग्णाला वापरण्यापूर्वी सॅनिटाईज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकच मास्क बरेच दिवस वापरल्यामुळेही ब्लॅक फंगस होण्याची शक्मयता असल्याचेही मंत्री के. सुधाकर यावेळी बोलताना म्हणाले.