ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी जगभरातील 150 हून अधिक देशांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. या सर्व देशांचा गट जागतिक आरोग्य संघटनेशी जोडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याने अमेरिका या आंतरराष्ट्रीय समुदायासोबत लस विकसित करणे तसेच त्याच्या वितरणासाठी काम करणार नाही, असे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटना चीनच्या प्रभावाखाली काम करत असल्याने अमेरिकेला मनाविरुद्ध या आंतरराष्ट्रीय गटासोबत काम करावे लागेल. ते अमेरिकेला मान्य नाही.
अमेरिका स्वबळावर लस विकसित करत आहे. AstraZeneca ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून, चाचणी पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात पोहचली असल्याचे दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी म्हटले होते.









