ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियात तयार करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्याचा दावा रशियाच्या सेकनॉफ युनिव्हर्सिटीने केला आहे.भारतातील रशियन दुतावासाने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
विद्यापीठाचे प्रमुख संशोधक इलिना स्मोलयारचुक म्हणाले, रशियात कोरोना लसीचे संशोधन पूर्ण झाले आहे.रशियात जगातील पहिली लस तयार झाली असून, ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. 18 जूनपासून रशियाच्या गमलेई इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीद्वारे तयार केलेल्या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या होत्या. त्या सर्व चाचण्या यशस्वी ठरल्या. त्यानंतर रविवारी सेचेनोव विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी कोरोनावर प्रभावी अशी जगातील पहिली लस तयार केल्याचा दावा केला.
संपूर्ण जगात कोरोना लसीवर संशोधन सुरू आहे. भारतातही कोव्हॅक्सिन नावाच्या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. भारत बायोटेक कंपनीने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषेदच्या यांच्या संयुक्त प्रयत्नांतून ही लस तयार केली आहे.









