न्यायाधीश गंगाधरमठ – अकोळ येथे कायदा साक्षरता अभियान
वार्ताहर/ अकोळ
कोरोना या महाभयंकर रोगावर मात करण्यासाठी शासनाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू केली आहे. प्रत्येकाने निर्भयपणे ही लस घेऊन मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन निपाणीतील वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश एस. बी. गंगाधरमठ यांनी केले.
निपाणी बार असोसिएशन, ग्रा. पं. अकोळ, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कायदा साक्षरता अभियान व कोरोना प्रतिबंधक लसीकरण जागृती शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रा. पं. अध्यक्षा अनिता मुधाळे होत्या. ऍड. आर. बी. तावदारे यांनी जनन-मरण नोंदीचे महत्त्व सांगितले. वकील संघाचे अध्यक्ष आर. एम. पाटील यांनी पंचायतराज कायद्यांतर्गत मिळणाऱया सुविधा व त्याबाबत ग्रामस्थांनी घ्यावयाची काळजी याविषयी माहिती दिली.
तालुका वैद्याधिकारी डॉ. व्ही. व्ही. शिंदे यांनी शासकीय रुग्णालयात सुरू असलेल्या कोरोना लसीकरणासह इतर साथीच्या आजारांबद्दल उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. शितल कुलकर्णी, पीडीओ ए. एम. गोपागोळ, वकील संघाचे संचिव एम. ए. सनदी, सहसचिव एन. एस. हत्ती, सदस्य ऍड. बी. बी. पाटील, ऍड. विकास संकपाळ,
ऍड. उदय झिनगे यांच्यासह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, ग्रा. पं. सदस्य, आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नायकर ब्रदर यांनी स्वागत कप्रास्ताविक केले.









