केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी कोविड लसीचा घेतला दुसरा डोस
बेंगळूर/प्रतिनिधी
केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांना बुधवारी बेंगळूर येथे कोविड -१९ लसीचा दुसरा डोस घेतला. मंत्री मंत्री सदानंद गौडा यांनी भीती न बाळगता नागरिकांनी कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले.
दरम्यान मल्लेश्वरम येथील केसी जनरल हॉस्पिटलमध्ये रोगप्रतिबंधक लस घेतली. यांनतर त्यांनी “कोविड लसीकरण मोहिमेस सर्वांनी सहकार्य करावे अशी मी नम्र विनंती केली. ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येकाने लसीकरणासाठी पुढे यावे. आपण सर्वांनी लस घेतली पाहिजे. ही दुसरी लाट कमी करण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून कोरोना लसीकरण केले पाहिजे, असे ते म्हणले. “









