उस्मानाबाद / प्रतिनिधी
जिल्हयात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.त्यामुळे कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करताना कोरोनाच्या लसीकरणाचा वेग वाढवून त्यास गती द्या,असे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे संबंधित यंत्रणांना दिले.
जिल्हयात कोरोनाच्या लसीकरणाच्या अंमलबजावणीबाबत टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात घेण्यात आली. तेव्हा ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजयकुमार फड,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ.डी.के. पाटील, जिल्हा परिषदेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. मिटकरी, डॉ.बोडके आदी यावेळी उपस्थित होते.
फ्रंटलाईन कोरोना योध्यांपैकी ज्यांचे लसीकरण राहिले आहे त्याचे लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे,प्रामुख्याने वैद्यकीय सेवेत असलेल्या फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांनी-आधिकाऱ्यांचे अद्याप बाकी असलेले लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या.असे सांगून कोरोना टेस्टची माहिती,ज्यांच्या कोरोना टेस्ट होणे आवश्यक आहे,त्याची माहिती घेऊन त्यांच्या कोरोना टेस्टला प्राधान्य देणे आवश्यक आहे.या कामांना प्राधान्य देण्याबरोबरच विविध विषयांची माहिती जी ऑनलाईन,डॅशबोर्ड आदी ठिकाणी भरणे आवश्यक आहे.ती वेळेत आणि अचूकपणे भरण्यात यावी,असेही निर्देश दिवेगावकर यांनी यावेळी दिले.
येत्या 1 एप्रिल 2021 पासून जिल्हयातील 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.त्याची आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे.असे सांगून जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर म्हणाले,45 वर्षावयावरील पत्रकार,पोलिस,राज्य परिवहन महामंडळातील (एस.टी) कर्मचारी आदींना यांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात यावे, असही निर्देश दिवेगावकर यांनी यावेळी दिले.
Previous Articleएक वर्षापर्यंत ‘कार’मध्येच राहिली डॉक्टर
Next Article शनिपार चौकात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन









