कोरोना लसीकरणासाठी सहाय्यभूत कोविन ऍप स्वतःच्या अंतिम टप्प्यात आहे. परंतु अद्याप हा ऍप गुगल प्ले स्टोअर किंवा अन्य ऍप स्टोअरवर उपलब्ध करण्यात आलेला नाही. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आरोग्य कर्मचारी आणि प्रंटलाइन कर्मचाऱयांचा विदा जमविला जात आहे. या कर्मचाऱयांना प्राधान्यांतर्गत कोविड-19 ची लस दिली जाणार आहे.
या कर्मचाऱयांचा विदा को-विन सॉफ्टवेअरवर अपलोड केला जात आहे. को-विन मोफत डाउनलोड करता येणार आहे. हे लसीशी संबंधित विदा नोंदविण्यास मदत करणार आहे. एखाद्या व्यक्तीला लस टोचून घ्यायची असल्यास त्याला ऍपवर नोंदणी करावी लागणार आहे.
प्रत्येक वापरकर्त्याला युनिक आयडी

कोविन ऍप लस टोचून घेणाऱया प्रत्येक वापरकर्त्यासाठी एक युनिक आयडी निर्माण करणार आहे. ऍपद्वारे वापरकर्त्याला लसीकरणाची वेळ आणि केंद्रासंबंधी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर संदेश पाठविला जाणार आहे. कोविन ऍपमधून 12 भाषांमध्ये एसएमएस पाठविण्याची सुविधा असणार आहे.
चॅट बॉटची सुविधा
कोविन ऍपवर पूर्णवेळ हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध असणार आहे. कोविन ऍपमध्ये चॅट बॉट सुविधाही असणार आहे. ते पॅटर्न रिकाग्निशनद्वारे पोर्टला नेविगेट करण्यास मदत करणार आहे. कोविन ऍपद्वारे माहिती-तंत्रज्ञान आधारित व्यासपीठाद्वारे लसीकरणाशी संबंधित लोकांना प्रशिक्षणाची सुविधाही उपलब्ध असेल. देशात आतापर्यंत 700 हून अधिक जिल्हय़ांमध्ये 90 हजारांहून अधिक वापरकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
क्यूआर कोड
लसीकरणात भ्रष्टाचार रोखण्यासाठी ऍप आधारकार्डाद्वारे प्रमाणन करणार आहे. लसीचे दोन डोस दिल्यावर ऍपद्वारे एक क्यूआर कोड तयार होणार आहे. हा क्यूआर कोड डिजी लॉकर ऍपमध्ये सुरक्षित राहणार आहे. कुठल्याही प्रकारच्या दुष्परिणामाशी संबंधित घटनांच्या माहितीसह संबंधिताला ट्रक करणार आहे.









