ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
आज संपूर्ण जगासमोर कोरोनाचे मोठं संकट उभे आहे. कोरोनाशी लढताना भारताने जगाला वेगळे उदाहरण दिले आहे. भारत देश या लढाईसाठी सज्ज असून खंबीरपणे पुढे जात आहे. असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीचा आज 40 वा वर्धापन दिवस आहे. त्यानिमित्त भाजपच्या कार्यकर्त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून संदेश दिला. त्यावेळी ते बोलत होते.
मोदी म्हणाले, भारताने घेतलेल्या निर्णयाचे इतर सर्व देशांनी स्वागत केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने प्रशंसा केली आहे. आज आपण सर्व एकजूट होऊन या लढाईच्या विरोधात लढत आहोत. यात आपल्याला जिंकायचे आहे. जिंकून पुढे जायचं आहे असं ही ते यावेळी म्हणाले.
यावेळी मोदींनी भाजपच्या कार्यकर्त्यांना पाच दिल्या आहेत. यामध्ये जनता उपाशी राहू नये म्हणून गरिबांच्या राशन साठी अविरत सेवा अभियान सुरु करा. तसेच या संकटाच्या काळात स्वतःचं रक्षण करण्याबरोबरच इतरांच्या रक्षणासाठी त्यांना मास्क चे वाटप करा. तसेच जे जे कोरोना लढ्यामध्ये सहभागी आहेत, कर्तव्य बजावत आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद अभियान राबवण्याचे आवाहन यावेळी मोदींनी केले.
तसेच केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आलेले ‘आरोग्य सेतू ॲप’ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा आणि पंतप्रधान मदत निधी मध्ये अनेक जण योगदान देत आहेत. तसे भाजप कार्यकर्त्यांनी ही त्यामध्ये योगदान द्यावे आणि एका कार्यकर्त्याने आपल्याजवळील 40 लोकांना यामध्ये योगदान देण्यास सांगावं अशा सूचना मोदी यांनी दिले आहेत.









