सर्व यंत्रणांनी काम केल्यामुळे कोरोना नियंत्रणाला यश – जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी
कोरोना विरुद्धच्या लढाईला एक वर्ष झाले या एक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याने कोरोना रोखण्यात फार मोठे यश मिळविले राज्यातील पहिल्या पाच जिल्ह्यात सिंधुदुर्ग जिल्ह्य आहे हे यश मिळवताना आशा सेविका,अंगणवाडी सेविका पासून पोलीस व आरोग्य यंत्रणा ,विविध सामाजिक संस्थांनी खूप चांगलं काम आणि सहकार्य केले त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण ठेवता आले अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिली आहे. कोरोनावर कोरोनावर नियंत्रण ठेवता आले तरी कोरोना विरुद्धची लढाई संपलेली नाही शासनाने जाहीर केल्याप्रमाणे माझी जबाबदारी ओळखून प्रत्येकाने कोविडचे नियम पाळावेत ,60 वर्षावरील वयोवृध्द लोकानी आणि 45 ते 59 वर्ष वयोगटातील व्यधिग्रस्त लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी केले आहे
| ReplyForward |









