प्रतिनिधी / आष्टा
कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रूग्णांना उपचारासाठी कुठे ठेवायचे हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या आष्टा येथील आयुर्वेद कॉलेजचे रूग्णालय वापरायला द्यावे अशी अपेक्षा सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी ङॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली.
यास आम्ही प्रतिसाद देवून मिरजेच्या सेवासदन हॉस्पिटलचे प्रमुख ङॉ. मा. रविकांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली आष्टा येथील ङॉ. व्हटकर, ङॉ. प्रविण कोळी, ङॉ. सुमित कबाङे, ङॉ. सुजय कबाङगे हे पन्नास रूग्णांची सोय होईल एवढ्या खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल तयार करित आहेत. असे स्पट करुन डांगे म्हणाले कोरोना रूग्णांची सोय करण्यासंबंधीची त्यांची ओढ व गरज लक्षात घेवून आम्ही पन्नासच काय शंभर बेङची सोय आमच्या आष्टा, ता. वाळवा येथील हॉस्पिटलमध्ये करून देण्यास तयार आहोत असे स्पष्ट केलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








