प्रतिनिधी / रत्नागिरी
गेल्या दोन तीन दिवसात जिल्हा प्रशासनाने कोरोना चाचणी अधिक भर दिल्याने दिवसाला 300 ते 400 रूग्ण पॉझिटीव्ह आढळून येत आहेत. येथील महिला रूग्णालयातच कोरोना चाचणी केली जाते आणि याच ठिकाणी पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती भरली जाते. शंभर-दोनशे रूग्णांसमोर दोन ते तीनच कर्मचारी माहिती भरून घेण्यासाठी असल्याने रूग्णांसह त्यांचे नातेवाईक संपूर्ण यंत्रणेसमोर हतबल झाल्याचे दृश्य महिला रूग्णालयात पहावयास मिळाले.
जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शुकवारी महिला रूग्णालयाला भेट दिली. याठिकाणी रूग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी याचठिकाणी असणाऱया इमारतीत जवळपास 200 बेड वाढविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच इतर समस्या या एक दोन दिवसात दूर करून यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पयत्न सुरू आहे. कोरोनाचा संसर्ग अधिक वाढू नये यासाठी चाचण्यांचे पमाण वाढविण्यात आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









