प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात विविध रूग्णालयांत उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांवर व्यवस्थितपणे उपचार होतात हे तपासण्यासाठी नेमण्यात आलेल्या ट्रिटमेंट ऑडिट पथकाने कडकपणे तपासणी करावी. तपासणीमध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधितांच्या निदर्शनास आणून त्या तात्काळ दुरूस्त कराव्यात, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर पोलिस अधीक्षक मनिषा डुबुले, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस आदि उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी कोरोना संसर्गाची जिल्ह्यातील सद्यस्थिती, उपलब्ध बेड्स, ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा, व्हेंटिलेटर, टेस्टिंग किट, बिलांचे व उपचाराचे ऑडिट या अनुषंगाने सविस्तर आढावा घेतला. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत वेळोवेळी चर्चा करून मार्गदर्शन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात 3 ऑक्टोबर अखेर एकूण 38 हजार 518 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांपैकी 30 हजार 506 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये 1 हजार 59, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 326, कोविड केअर सेंटरमध्ये 285 रूग्ण उपचार घेत असून होम आयसोलेशनमध्ये 4 हजार 866 रूग्ण आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








