तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
कोरोणा विषाणूंचा प्रादुर्भाव बार्शी शहर आणि तालुक्यांमध्ये जोमाने होत आहे. कोरोना रुग्णांना तात्काळ उपचार मिळावा यासाठी शासनाने काही दवाखाने हे कोरोणा डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून जाहीर केले आहेत. त्यात बार्शी येथील कर्मवीर जगदाळे मामा हॉस्पिटल याचाही समावेश आहे. परंतु कोरोणा चा उपचार सर्वसामान्य नागरिकाला तात्काळ आणि मोफत मिळावा यासाठी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजने मध्ये कोरोना उपचाराचा समावेश करून त्या संबंधीत दवाखान्यात ही योजना तात्काळ लागू केली आहे. ही योजना सोलापूर जिल्ह्यात लागू झाली असून सोलापूर जिल्ह्यात आठ हॉस्पिटलला ही योजना लागू आहे. त्यात बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल या हॉस्पिटल चा समावेश असून या योजनेनुसार या हॉस्पिटलला तीनशे खाटाचे कोव्हिड डेडिकेटेड हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली आहे. मात्र गेली काही दिवस जगदाळे मामा हॉस्पिटल कोरोना रुग्णांना मोफत उपचार देत नाही अशा तक्रारी वारंवार प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत.
याविषयी जगदाळे मामा हॉस्पिटल प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की जगदाळे मामा हॉस्पिटल ला कोरोनावर मोफत उपचार होणार नाहीत मात्र शासन आदेश, यावेळी जिल्हाधिकारी , जिल्हा शल्यचिकित्सक यांचे आदेश आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेशी जगदाळे मामा हॉस्पिटल केलेला करार पाहता जगदाळे मामा हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार होणार नाही हा दावा फोल ठरत असून जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये कोरोना रुग्णांवर मोफत उपचार नाकारण्याचा गंभीर प्रकार घडत असल्याचे सिद्ध होत आहे.
याविषयी दैनिक तरुण भारत संवाद ने महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांनी स्पष्ट सांगितले की बार्शी जगदाळे मामा हॉस्पिटल म्हणून जाहीर केले आहे आणि या हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना ही लागू आहे. मात्र योजना जगदाळे मामा हॉस्पिटल कार्यान्वित करत नसल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत. कोरोणा रुग्ण यांच्यावर संपूर्ण उपचार मोफत आहे. शासनाच्या सुधारित आदेशानुसार कोरोनाचा रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यास तात्काळ उपचार चालू करावे लागणार आहेत कारण तसा जगदाळे मामा हॉस्पिटल आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना सोसायटी यांच्यात करार झालेला आहे आणि कोरोणा रुग्णाच्या उपचाराबाबत शासन संवेदनशील असून या रुग्णांचा खर्च हा त्या संबंधित हॉस्पिटलला तात्काळ अदा केला जाणार आहे.
संगणक आणि इतर बाबी साठी मुदतवाढ मागितली – पोळ
कोरोणा रुग्णांना उपचार करण्यासाठी बार्शीतील जगदाळे मामा या हॉस्पिटलला महात्मा फुले जन आरोग्य योजना तात्काळ लागू करण्यात आलेले असून याविषयी जन आरोग्य योजनेसाठी आरोग्य मित्र यांची नेमणूक झाली आहे हे त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे मात्र याबाबत जगदाळे मामा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंट आम्हाला पत्र दिले आहे की लोक डाऊन मुळे कॉम्प्युटर स्कॅनर प्रिंटर आणि वायरिंग चे काम करण्यासाठी मुदतवाढ द्यावी साहित्य मिळत नाही त्यामुळे ही योजना लागू करण्यासाठी पंधरा दिवस मुदतवाढ मागितल्याचे पत्र आम्हास प्राप्त झाले आहे.
अरुण पोळ , सुपरवायझर , महात्मा फुले जन आरोग्य योजना, बार्शी
जगदाळे मामा हॉस्पिटलशि करार झाला आहे
कोरोना रुग्णांना उपचार तातडीने आणि मोफत मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात आठ डेडिकेटेड हॉस्पिटल ला महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित केली असून बार्शी जगदाळे मामा हॉस्पिटल ला ही योजना कार्यान्वित झाली आहे याबाबत जगदाळे मामा हॉस्पिटल च्या व्यवस्थापनाशी करार झाला असून त्यांनी हे उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून तात्काळ आणि विला विनाविलंब करून दिले पाहिजेत. आणि महत्वाचे म्हणजे जे जे जगदाळे मामा हॉस्पिटल ने आम्हाला विनंती करून त्यांच्या दवाखान्यात ही योजना लागू करावी अशी मागणी केली होती.
डॉ. अमोल मस्के, समन्वयक महात्मा फुले जन आरोग्य योजना, पुणे विभाग
जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी कोरोना रुग्णा वरती मोफत उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मिळत नाहीत याबाबत जगदाळे मामा हॉस्पिटल चे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. रामचंद्र जगताप यांच्याशी याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला असता त्यांनी सांगितले की मी गाडी चालवत आहे नंतर प्रतिक्रिया देतो मात्र नंतर अनेक वेळा फोन करूनही त्यांनी फोन घेतला नाही व प्रतिक्रिया दिली नाही.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








