अक्कलकोट/प्रतिनिधी
अक्कलकोट शहरात व तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत, रुग्णाना व संपर्कातील लोकांना प्रशासन व आरोग्य विभागाकडुन योग्य सुविधा मिळावी अशी संजय देशमुख यांनी मागणी केली.
प्रदेश शिवसेनेच्या आदेशानुसार तालुकाप्रमुख संजय देशमुख व शहरप्रमुख योगेश पवार यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी शिवसेनेच्या टिमने कोविड- 19 विभागास भेट देऊन तेथील रुग्णांची समस्या जाणुन घेतली. संबधीत अधिकाऱ्यांना चागंल्या सोई देण्याचे सुचना देण्यात आल्या. रुग्ण व संपर्कातील लोकाशी सोशल डिस्टन ठेऊन समस्या विचारण्यात आल्या. जेवण , नाष्टा, गरमपाणी, पिण्याच्या पाण्याची समस्या असेल तर तात्काळ फोन करा शिवसेना कार्यालयाकडून ते देण्यात येईल असे सांगण्यात आले.
लहान मुलाना दुध मिळत नसल्याची तक्रार महिला रुग्णानी केल. शहरप्रमुख योगेश पवार यानी लहान मुलानसाठी दुधाची व्यवस्था केली. स्वतः तालुका प्रमुख सजंय देशमुख यांनी मोबाईल नंबर दिले. आपल्या कांही समस्या असतील तर त्या लगेच सोडवण्यात येतील असे त्यांनी सांगितले. यावेळी तहसिलदार व आरोग्य अधिका-यांशी सपंर्क साधुन चोकशी केली. यावेळी जिल्हा युवा सेना प्रमुख मनिष काळजे यांनी ही रुग्णांची भेट घेतली. युवा सेने कडुन योग्य ती मदत देऊ असे म्हणाले. यावेळी तालुका उपप्रमुख प्रा. सुर्यकांत कडबगांवकर, उपप्रमुख प्रविण घाटगे, प्रसिध्दी प्रमुख बसवराज बिराजदार व शहर व तालुक्यातील शिवसैनीक उपस्थीत होते.
Previous Articleशेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्जाचे वाटप वेळेत करावे : दीपक म्हैसेकर
Next Article शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिलीप जोशी यांचे निधन









