प्रतिनिधी / पेठ वडगाव
हातकणंगले तालुक्यातील कोविड सेंटरमधून कोरोना रुग्णांना चार ते पाच दिवसात घरी पाठविण्यात येत असून या रुग्णामुळे गावात कोरोनाचा प्रसार होण्याची भीती तालुक्यातील नागरीकातून व्यक्त होत आहे. त्रास जाणवत नसणार्या कोरोना रुग्णांना घरी सोडविण्यात येत असले तरी त्यांची घरी अलगीकरणात राहण्याची सोय आहे का? याचीही माहिती घेतली जात नाही. सध्या रुग्णांची संख्या व कोरोना चाचणीसाठी रुग्णांची संख्या प्रचंड वाढल्याने लक्षणे दिसत नसलेल्या रुग्णांना कोरोना चाचणी निगेटीव्ह आहे का हे पाहिल्याशिवाय घरी सोडण्यात येत असल्यामुळे कोरोना प्रसाराचा धोका होण्याची शक्यता आहे. यामुळे आता प्रभाग समितीने व प्रशासनाने होम कोरोन्टाइनचे नियम संबंधित कोरोना रुग्ण पाळत आहेत का यासाठी दक्ष राहण्याची गरज आहे.
हातकणंगले तालुक्यातील कोविड सेंटरमधून कोरोना रुग्णांना चार ते पाच दिवसात घरी पाठविण्यात येत आहे. या रुग्णांची कोरोना चाचणी करून ते निगेटीव्ह आहेत का हेही पहिले जात नाही. तर कमी लक्षणे अथवा त्रास जाणवत नसणार्या रुग्णांना घरी पाठविण्यात येत असून होम कोरोन्टाइनचे पत्र देवून घरी पाठविण्यात येत आहे. या रुग्णांची घरी अलगीकरणात राहण्याची सोय आहे का? हेही पहिले जात नाही अथवा चौकशी केली जात नाही. यामुळे अशा पद्धतीने देण्यात येणारे डिस्चार्ज कोरोना प्रसारास मदत करणारे ठरण्याची शक्यता आहे.
या रुग्णांना होम कोरोन्टाइनचे पत्र कोविड सेंटरमधून दिल्यामुळे स्थानिक पालिका अथवा ग्रामपंचायत प्रशासनाच्या कोरोना नियंत्रणाचे काम करत असलेल्या पालिका कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचेशी हे रुग्ण व नातेवाईक वाद घालत असल्याचे चित्र आहे. यामुळे या कोविड केंद्रावरून रुग्ण निगेटीव्ह आहे का? याचा रिपोर्ट आल्याशिवाय घरी सोडू नये तर नाइलाजास्तव कोविड केंद्रात जागा नसल्यामुळे डिस्चार्ज करावे लागत असेल तर या रुग्णांची घरी अलगीकरणात राहण्याची योग्य सोय नसल्यास पालिकेच्या अथवा ग्रामपंचायतीच्या सूचनेप्रमाणे संस्थात्मक अलगीकरणात राहावे असा शेरा डिस्चार्ज पत्रावर मारून देण्याची गरज आहे.
सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून कोविड सेंटरवर प्रचंड ताण वाढला आहे. यामुळे यामुळे लक्षणे अथवा त्रास नसणार्या कोरोना रुग्णांना घरी पाठविले जात आहे. मात्र या रुग्णांना चार ते पाच दिवसात घरी सोडत असताना कोरोन्टाइनची सोय आहे का याची खात्री करून घरी पाठविण्याची गरज आहे. अन्यथा या रुग्णामुळे कोरोणाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर कोरोनाचा दिवसेंदिवस संसर्ग वाढत चालला असताना अशा प्रकारे रुग्णांना डिस्चार्ज देण्याच्या प्रकारामुळे कोरोना प्रसारास कारणीभूत ठरणार आहे.
यामुळे या बाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी या बाबत योग्य त्या सूचना संबंधित यंत्रणेस सूचना देण्याची गरज व्यक्त होत आहे. तर सध्या कोरोना संसर्ग वाढत चालल्यामुळे थंडावलेली कोरोना नियंत्रण प्रभाग समितीने आता दक्ष होवून आपल्या प्रभागात होम कोरोन्टाइन व्यक्ती प्रशासनाचे नियम पाळत आहेत का? अशा व्यक्ती घराबाहेर पडून कोरोना संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरत आहेत का ? यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









