ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी आता नौसेनाही धावून आली आहे. पश्चिम नौसेनेच्या 57 मेडिकल सदस्यांची एक टीम अहमदाबाद येथील ‘पीएम केअर्स कोविड रुग्णालया’त तैनात करण्यात आली आहे. या मेडिकल टीममध्ये 4 डॉक्टर, 7 नर्सेस, 26 पॅरामेडिकल स्टाफ आणि 20 सपोर्टींग स्टाफचा समावेश आहे. मुंबईतील पश्चिम नौसेना कमांडकडून ही माहिती देण्यात आली.
कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी गुजरातमधील अहमदाबादमध्ये ‘पीएम केअर्स कोविड रुग्णालय’ उभारण्यात आले आहे. या रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढील दोन महिने नौसेनेची ही मेडिकल टीम तैनात असणार आहे.









