638 तपासणी अहवालांची प्रतीक्षा : आणखी 51 पॉझिटिव्ह, 47 जणांना डिस्चार्ज
- आणखी एका रुग्णाचा मृत्यू, एकूण 46 जणांचा मृत्यू
- एकूण 1 हजार 491 जण कोरोना मुक्त
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हय़ात मंगळवारी आणखी 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या अडीच हजारावर गेली आहे. बरे झालेल्या आणखी 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान गत दोन दिवसांत रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी कोरोना नमुना तपासण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तब्बल 638 कोरोना नमुने तपासणी करायचे आहेत, ही बाबही महत्वाची आहे.
जिल्हय़ात गेल्या पंधरा दिवसांत शंभरच्या पटीत कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असताना गेल्या दोन दिवसात ती निम्म्यावर 50 पर्यंत आली आहे. असे असले, तरी कोरोना नमुने तपासणीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोना नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. चार-चार दिवसांचे अहवाल प्रलंबित आहेत. 638 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.
जिल्हय़ात नव्याने 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 520 म्हणजेच अडीच हजारावर गेली आहे. तर बरे झालेल्या 47 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण 1 हजार 491 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात सक्रिय 983 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालवण येथील एका 68 वषीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 46 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 20692
आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने 2520
आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने 17534
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 638
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 983
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 46
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 1491
गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 8345
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 12562









