ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत कोरोनाच्या स्थितीमध्ये सुधारणा होताना दिसत आहे. मागील 24 तासात 13,336 नवे रुग्ण तर 273 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 14,738 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बऱ्याच दिवसांनी दिल्लीत 15 हजार पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 6 दिवसापासून दैनंदिन रुग्णांमध्ये देखील घट होताना दिसत आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 13 लाख 23 हजार 567 वर पोहोचली आहे. त्यातील 12 लाख 17 हजार 991 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. तर 19,344 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून राजधानीत रुग्ण बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
सद्य स्थितीत 86 हजार 232 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील 19,912 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. कोविड केअर केंद्रात 626 जण आहेत. तर 52,263 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रविवारी 61,552 रुग्णांचे नमुने घेण्यात आले. दिल्लीत आतापर्यंत जवळपास 1 कोटी 78 लाख 13 हजार 061 टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यातील 21.67 टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 49,787 आरटीपीसीआर टेस्ट आणि 11,765 रैपिड एंटिजेन टेस्ट काल एका दिवसात करण्यात आल्या आहेत.









