प्रतिनिधी / वाकरे
राज्यात आणि जिल्ह्यात महापूर, कोरोनासारखी संकटे आली तेव्हा करवीर राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच मदतीसाठी पुढाकार घेतला असून कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्याचे काम कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए.वाय.पाटील यांनी काढले.
बालिंगे हायस्कूलमध्ये करवीर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र प्रदान कार्यक्रमात अध्यक्ष पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल साळोखे होते. मधुकर जांबळे यांनी कोरोना काळात डॉक्टर,आरोग्य सेवक, आशा वर्कर्स,पत्रकार यांनी तळमळीने जोखमीचे काम केल्याने जनता घरात सुरक्षित असल्याचे ते म्हणाले.
स्वागत पत्रकार ताज मुल्लाणी यांनी केले. यावेळी ए.वाय पाटील,अनिल साळोखे यांच्या हस्ते डॉक्टर्स, पत्रकार, आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका, आरोग्य आणि ग्रा.पं. कर्मचारी या कोरोना योद्ध्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. आभार शिवाजीराव देसाई यांनी मानले. कार्यक्रमाला भारती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष वसंतराव जांभळे, जनार्दन जांभळे, एम.एस.भवड ,राजाराम कासार,सुनिल परीट,विकास माने,अमोल भास्कर,राहुल कर्णे,दिलीप सावंत,सुनिल पाटील,पंडित कळके उपस्थित होते. मधुकर जांभळे यांनी केले. मंदार पाटील यांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस निवडीचे पत्र देण्यात आले.
Previous Articleड्रग रॅकेट प्रकरणातील मुख्य आरोपी फरार
Next Article मराठा आरक्षण ‘एसईबीसी’ मधूनच घेणार









