प्रतिनिधी / बोरगाव
वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील साईभक्त उल्हास हणमंत घाडगे तात्या यांनी संपूर्ण देशावर कोरोनाचा संसर्ग होत आहे या कोरोनाचा नायनाट होऊन सर्व जनजीवन सुरळीत व्हावे, यासाठी आपल्या सहकारी साईभक्तांना घेऊन बोरगाव ते शिर्डी पायी पालखी सोहळा हा उपक्रम राबविला आहे.
या पालखी सोहळ्यात उल्हास तात्या, नामदेव माने, इस्लामपूर, बोरगाव मधील इंद्रजीत घाडगे, रणजीत घाडगे, सुरज पाणके, ओंकार शिंदे, अक्षय घाडगे, अविनाश वाटेगावकर, ऋषिकेश पाटील, किरण चव्हाण या साईभक्तांनी ऊन, वारा, पाऊस सहन करीत पायी वारी केली. त्यांनी ३८० किलोमीटर अंतर अवघ्या सहा दिवसात पायी पूर्ण केले. सर्व जनतेच्या आरोग्यासाठी व कोरोनाच्या मुक्तीसाठी त्यांनी साईबाबांना साकडे घातले. कोरोनाच्या या चक्रव्यूहातुन साईभक्त व सर्व लोकांची सुटका होऊन दे, महामारी थांबू दे, लोकांचे जगणे सुसह्य होऊन दे, अशी मंगलमय प्रार्थना त्यांनी केली.
यावेळी उल्हासतात्या घाडगे म्हणाले, सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. जीवा भावाच्या माणसांच्या जाण्याने मनाला प्रचंड वेदना होत आहेत. दररोजच्या कोरोना बळींची आकडेवारी पाहून मन गलबलून जातं. साईंच्या कृपेने, श्रद्धा व सबुरीने हे सगळे थांबावे असे मनोमन वाटते. विश्वास, नामस्मरण, प्रार्थना यामध्ये प्रचंड मोठे सामर्थ्य असतं. अधिकमासाच्या पर्व काळा निमित्ताने हा वारीचा उपक्रम राबविला आहे कोरोनापासून मुक्ती मिळावी, यासाठी हें साकडे साईबाबांना घातले.
या वारीसाठी आळसुंदचे प्रदीप पाटील, कातर खटावचे असिफ मुल्ला, बारामतीचे कुमठेकर काका, काष्ठीचे गणेश डोईफोडे, नगरचे अंकुश गवळी, धारगावचा ज्ञानेश्वरी ग्रुप, विसापूरचा फौजी धाबा, शिर्डीचे गोरखभाऊ सुराळे, दिलीप वाकचौरे, पुजारी भिसे गुरुजी, राहुरीची साई सोसायटी, कपाळे बंधुनी या प्रवासात भक्तांची उत्तम सोय व सेवा केली. विकास पाटील, धैयशील पाटील, विजय डांगे, उदयसिंह पाटील, रवींद्र सुतार, नामदेव माने, सदानंद शिंदे, जे डी डांगे, खडके साहेब यांनी या वारीसाठी मोलाचे सहकार्य केले.
Previous Articleराज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडून अंगडी कुटुंबियांचे सांत्वन
Next Article ग्रामीण विकास रुतला कोरोना खाईत








