इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीतील बांधकाम व्यवसायिक चंद्रकांत शांतीलाल पटेल यांनी गुरूवारी पहाटे राहत्या इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केल़ी शहरातील माळनाका येथील तारा ऑर्किड येथे ही घटना घडल़ी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलेला पटेल यांचा मृतदेह दिसून आल़ा या घटनेने शहरातील बांधकाम क्षेत्रात खळबळ उडाली आह़े
चंद्रकांत पटेल हे मुळचे राजकोट गुजरात येथील रहिवासी आहेत़ काही दिवसांपूर्वीच ते राजकोट या आपल्या गावी गेले होत़े त्याठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाली होत़ी त्यावर यशस्वी मात करून ते 23 डिसेंबर रोजी रत्नागिरीत परतले होत़े गुरूवारी सकाळी त्यांनी आपल्या फ्लॅटला बाहेरून कडी लावून घेत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल़ी
या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल़ा पटेल यांच्या नावावर रत्नागिरीत 4 सदनिका आहेत. त्यांची एकंदर आर्थिक स्थितीही चांगली असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान पटेल यांनी आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाह़ी पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आह़े









