संतप्त व्यापाऱ्यांचा सांगलीत मोर्चा, टाळेबंदीच्या निर्णयावरून संभाजीराव भिडे यांची जोरदार टीका
प्रतिनिधी/सांगली
ब्रेक द चेन या मोहिमेंतर्गत राज्यशासनाने घोषित केलेल्या टाळेबंदी अंतर्गत दुकाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात सांगलीतील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे गुरुजी यांनी कोरोना हा मानसिक रोग आहे. टाळे बंदीचा निर्णय घेणाऱ्या राज्य शासनाला कवडीची अक्कल नाही. अशा शब्दात सरकारवर टीकेचा भडीमार केला.
शासनाने यामधून अंग काढून घ्यावे. स्वतःची काळजी घेण्यास लोक सक्षम आहेत. टाळेबंदी लावून शासन दुशासन होत आहे. निव्वळ मूर्खपणा सुरू असून निर्बंध कडक करा, पण व्यापार सुरु करण्यास परवानगी द्या अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा नेते शेखर इनामदार, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, शहर जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे, व्यापारी महासंघाचे अतुल शहा, युवा नेते पृथ्वीराज पवार, धीरज सूर्यवंशी, महेश खराडे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी, हातगाडीवाले, भाजी विक्रेते आणि दुकानदार सहभागी झाले होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









