- आतापर्यंत 48,26,371 रुग्ण कोरोनामुक्त !
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून घट होत आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत राज्यात तब्बल 59,318 जणांनी कोरोनावर मात केली. तर 34,389 नव्या रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवशी 974 जणांनी आपला जीव गमावला आहे. ही संख्या आतापर्यंतची सर्वात जास्त आहे. मृत्यूंचे हे वाढते प्रमाण चिंतेत भर घालणारे ठरत आहे.

दरम्यान, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 53 लाख 78 हजार 452 वर पोहचली आहे. यातील 48 लाख 26 हजार 371 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 81 हजार 486 एवढा आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.74 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.52 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 4 लाख 68 हजार 109 रुग्ण उपचार घेत आहेत.
आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 3 कोटी 11 लाख 03 हजार 991 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 53 लाख 78 हजार 452 (17. 29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 लाख 91 हजार 981 व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर 28 हजार 398 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.








