बाणस्तारी माटोळी बाजाराला प्रतिसाद
वार्ताहर / माशेल
बाणस्तारी येथील चतुर्थीच्या माटोळी बाजार काल बुधवारी सकाळी मारूती मंदिरापासून रस्त्याच्या बाजूला व मोकळया जागेत भरविण्यात आला. कृषि बागायती, रानटी साहित्य व फळांची विक्रेत्यांनी सामाजिक अंतर राखून बाजार गजबजला. पोफळी कातरे, नारळाची पेण, फळाची आवक बरीच कमी असूनही ग्राहक व व्यापाऱयांचा उत्साह मात्र कायम होता.
घाऊक व्यापारी आपल्या मालवाहू गाडय़ा घेऊन कृषि बागायतीचा मालाची खरेदी करून तात्काळ रवाना झाले. गर्दीचा माहोल न करणे अशी सक्त ताकीद पंचायत मंडळातर्फे असल्यामुळे ग्राहकांनीही या नियमाचे चोख अंमलबजावणी केलेली दिसून आली. बाजार दिवसभर गजबजलेला असून उशिरा रात्रीपर्यत ग्राहक खरेदी करीत हेते. कोरोना महामारीमुळे उदभवलेल्या परिस्थितीत आज बाजरात घाऊक व्यापारी संख्या कमी होती. तसेच अतिवृष्टीमुळेही बागायती उप्तादन घटल्याचे व्यापाऱयाची प्रतिक्रीया आहे. पोफळीचे कातरे रू. 500, रानटी साहित्य 50 रूपयांवरून पुढे असा एकंदरीत दर व्यापाऱयांनी लावला होता.