बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना रुग्णवाढीची संख्या कमी जास्त होत आहे. राज्याबरोबरच राजधानी बेंगळूरमध्ये गुरुवारी बाधित रुग्णांची संख्या वाढलेली पाहायला मिळाली. बेंगळूर शहरी जिल्ह्यात गुरुवारी ४,१९२ रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या गुरुवारी ४०,२८५ वर गेली. गुरुवारी जिल्ह्यातील ३८५४ रुग्णांनी कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले आहेत. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत २,७६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाखाच्या वर गेली आहे.
राज्यात काल ७ हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली. गेल्या चोवीस तासात शहरात ७,७१० नवीन कोरोना संसर्गग्रस्त रुग्ण आढळले आहेत. तर त्याच वेळी घरी परतणार्या रुग्णांची संख्या ६,७४८ होती. तर गेल्या चोवीस तासात राज्यात ६५ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ९५,५४९ सक्रिय रुग्ण आहेत. गुरुवारी राज्यात ६४,१६४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.









