प्रतिनिधी / जयसिंगपूर
हुपरी येथील ५० वर्षांचे गृहस्थ कोरोनाची बाधा झाल्यामुळे जयसिंगपूर येथील एका खाजगी प्रथितयश रुग्णालयात मागील चार दिवसांपासून उपचार घेत होते, उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला संबंधित रुग्णालयाने त्यांच्या मृत्यू बाबत तालुका प्रशासनाला तातडीने कळविले, मृतांच्या नातेवाईकांनी सदर रुग्णाचा मृतदेह हुपरी गावी नेण्यास असमर्थता दर्शविली यावर शिरोळच्या तहसिलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी जयसिंगपुर नगरपरिषदेस सदर बाधित रुग्णाच्या मृतदेहावर जयसिंगपूर मध्ये अंत्यसंस्कार करण्याबाबतच्या सूचना जयसिंगपूर नगरपरिषदेस दिल्या.
नगरपालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करत उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी श्रीमती टीना गवळी यांनी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा देऊन जयसिंगपूर उदगांव येथील वैकुंठ स्मशानभूमीत संबंधित मृतदेहाचा अंत्यविधी पार पाडला, या अंत्यविधीसाठी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी श्रीमती. टीना गवळी, नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, राजेंद्र झेले, अर्जुन देशमुख, बाळासाहेब वगरे व मृत रुग्णाचे मोजके नातेवाईक, नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचारी, संबंधित रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleस्थलजलभ्रांति झाली पाहीं
Next Article आतापर्यंत 40 हजार संशयितांची स्वॅब तपासणी









