बेळगाव 13 तर अथणी तालुक्यात 12 रुग्ण
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव जिह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. गेल्या 24 तासांत जिह्यातील आणखी 30 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये जिल्हा सशस्त्र दलाच्या तीन पोलिसांचाही समावेश आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.
उपलब्ध माहितीनुसार एका बेळगाव तालुक्मयात 13 तर अथणी तालुक्मयात 12 रुग्ण आढळून आले असून सौंदत्ती तालुक्मयातील 3, खानापूर व कणगला येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सर्व 30 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.









