बेळगाव शहर व तालुक्यातील 36 जणांचा समावेश, दहा मृतदेहांचा अहवाल प्रलंबित
प्रतिनिधी बेळगाव
बेळगाव शहर व जिह्यातील कोरोना बळींची संख्या वाढतीच आहे. आणखी सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून जिह्यातील बळींची संख्या 21 वर पोहोचली आहे. तर बुधवारी दिवसभरात 59 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांपैकी दोघे जण बेळगाव शहरातील आहेत.
बिम्स् प्रशासनाने एकंदर घडामोडींची माहिती लपवून ठेवण्याचा सपाटा सुरु केला आहे. तरुण भारतला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी अनगोळ येथील 77 वषीय वृध्द व कुमार स्वामी लेआऊट परिसरातील 58 वषीय हॉटेल व्यवसायिकाचा मृत्यू झाला होता. या दोघा जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.









