प्रतिनिधी /बेळगाव :
बेळगाव शहर व जिल्ह्य़ातील कोरोना बाधित व संशयितांचा मृत्यूंची मालिका सुरुच आहे. गेल्या 24 तासांत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली असून आणखी 161 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 58 जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांची संख्या 1500 हून अधिक झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार बेळगाव शहर व तालुका, बैलहोंगल, अथणी, गोकाक, हुक्केरी, रायबाग, खानापूर, रामदुर्ग, सौंदत्ती, चिकोडी आदी तालुक्मयातील 161 हून अधिक जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कटकोळ पोलीस स्थानकातील एका 30 वषीय पोलिसाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर रायबाग येथील परिवाहन मंडळाच्या सात कर्मचाऱयांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बेळगाव शहरातील विरभद्रनगर, न्युगांधीनगर, महांतेशनगर, विनायकनगर, रामतीर्थनगर, महाव्दार रोड, गणेशपूर, कॅम्प, बसव कॉलनी, शिवबसवनगर, जेएनएमसी हॉस्टेल, नेहरुनगर, मार्केटयार्ड, सदाशिवनगर, वैभवनगर, येथील 46 हून अधिक जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर सांबरा एअरफोर्समधील आणखी 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
गेल्या 24 तासांत बाराहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये कोरोना बाधित व संशयितांचा समावेश असून अथणी तालुक्मयातील 2, खानापूर तालुक्मयातील 1 च समावेश आहे. रायबाग तालुक्मयातील कंकणवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे. बेळगाव शहर व उपनगरातील पाचहून अधिक जणांचा यामध्ये समावेश आहे.
आरोग्य विभागाने मात्र यासंबंधी अधिकृत माहिती दिली नाही. दिवसभरात दोघा कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे अधिकारी सांगत असले तरी प्रत्यक्षात हा आकडा बाराहून अधिक असल्याचे समजते. सर्व मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात ठेवण्यात आले आहेत. दोघा कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ही जबाबदारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे सोपविण्यात आली आहे.
बुधवारी रात्री घी गल्ली येथील रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी बिम्स्वर हल्ला केला होता. या घटनेनंतर बिम्स् प्रशासन हादारुन गेला असला तरी कोविड-19 वॉर्डमधील व्यवस्थेत मात्र कसलीची सुधारणा झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या आठवडय़ाभरात रुग्ण संख्येत झपाटय़ाने वाढ झाल्याने मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी कोरोना बाधित सिव्हिल हॉस्पिटलमये दाखल होत आहेत. कमीतकमी मनुष्य बळात रुग्ण सेवा सुरु असल्याने बिम्स् प्रशासनावर साहजिकच ताण येत आहे.









