प्रतिनिधी / इस्लामपूर
राज्यात कोरोनाचे संकट वाढत असून सरकार अपयशी ठरत आहे. असा मुद्दा उपस्थित करीत भारतीय जनता युवामोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहूल महाडिक यांनी शिष्टमंडळासह राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी महाडीक यांनी निवेदन दिले.
राज्यामध्ये गेले अनेक दिवस कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांचे मृत्यू होत आहेत. अशा परिस्थितीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरत आहे. राज्यात हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत. ऑक्सिजन मिळत नाही.
ऑक्सिजन प्लॅन्ट मध्ये अपघात होत आहेत. यावेळी लोक गुदमरुन मृत्यूमुखी पडत आहेत. राज्यातील सामान्य जनतेला खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांची उपासमार सुरु आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी, छोटे व्यापारी, बलुतेदार, कामगार अडचणीत सापडला आहे. अशातच महावितरण कंपनी वीज बिलाची वसुली सक्तीने करीत आहे. हे तात्काळ थांबणे गरजेचे आहे. तरी राज्यपाल यांनी स्वतः लक्ष घालून ही विस्कटलेली यंत्रणा सुस्थितीत करावी, अशी मागणी महाडीक यानी निवेदनात केली आहे. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते स्वरूपराव पाटील, इस्लामपूर महाडिक युवाशक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात उपस्थित होते.
Previous Article”ऑक्सिजनचा सर्वात जास्त साठा महाराष्ट्राला, केंद्राप्रमाणे राज्याने व्यवस्थित नियोजन करावे”
Next Article ज्येष्ठ विधिज्ञ एडवोकेट एस. बी. पाटील यांचे निधन








