नवी दिल्ली
देशामध्ये सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या प्रभावामुळे एप्रिलमध्ये वाहन कंपन्यांची विक्री घसरणीत राहिली आहे. यामध्ये देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीची विक्री एप्रिलमध्ये चार टक्क्यांनी घटून 1,59,691 वर राहिली आहे. जी मार्चमध्ये 1,67,014 वर राहिली होती. अन्य कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार विटारा ब्रेझा, एस-क्रॉस आणि अर्टिगासह युटिलिटी वाहनांची विक्री 3 टक्क्यांनी घसरुन 25,484 वर राहिली आहे. हाच आकडा मार्चरोजी 26,174 राहिला होता. दुसऱया बाजूला एप्रिल महिन्यात वाहन निर्यात 49 टक्क्यांनी वधारुन 17,237 वर राहिल्याची नोंद केली आहे. हय़ुंदाई मोटार इंडिया लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार कंपनीची विक्री 59,203 युनिटवर आहे. हा आकडा मार्च महिन्याच्या तुलनेत 8 टक्क्यांनी घसरला आहे.