प्रतिनिधी / फोंडा
फोंडा तालुक्य़ात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव शहर परिसरात वाढतच असताना संपुर्ण फोंडा धारबांदोडाचे चाचणी केंद्र असलेल्या फेंडा येथील उपजिल्हा इस्पितळात दोघेजण पॉझिटीव्ह सापडले आहे. त्यामुळे समारे 1600 चाचणी अहवाल येण्यास विलंब झालेला आहे. तसेच येथे चाचणी करण्याचा वेग ही मंदावल्याचे चित्र दिसत आहे. फोंडा उपजिल्हा इस्पितळात स्वॅब नमून्याची चाचणी करणारा व नोंदणी करणाऱयासाठी असलेला आरोग्य कर्मचारी पॉझिटीव्ह सापडलेला आहे. फोंडा तालुक्यातील इतर भागात आडपई येथे 14 जण, पंडितवाडा येथे एकाच कुटूंबातील 4 जणांचा अहवाल सकारात्मक आलेला आहे. दाटीवाटीची लोकवस्ती असलेल्या दिपनगर कुर्टी येथे तिघेजण पॉझिटीव्ह सापडल्याने फोंडा परीसरातील लोकांनी धास्ती घेतली आहे. चिरपुटे बांदोडा येथे एकजण पॉझिटीव्ह सापडला असून पॉझिटीव्ह रूग्णांला नेण्यासाठी आलेल्या रूग्णवाहिका बलत्याच पत्त्य़ावर हजर झाल्यामुळे थोडावेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या तिस्क उसगांव भागातील सुमारे 250 चाचणी नमून्याच्या अहवाल अजून आलेला नसून सद्यपरिस्थितीत 30 जण पॉझिटीव्ह सापडलेले आहेत.